ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेसरी येथे वाचन प्रेरणा दिन

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

नेसरी वाचन मंदिर नेसरी येथे वाचन प्रेरणा दिन व वाचन सप्ताहानिमित्त डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन यशोधन शिंदे व सौ.ऐश्वर्या यशोधन शिंदे- (नेसरीकर)व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने संपन्न झाले.प्रास्ताविकात कार्यवाह वसंत पाटील यांनी दिवंगत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करणेबाबत ठराव मांडला.

सर्वानीं उभे राहून श्रद्धांजली वाहिली. प्रा.मटकर यांनी स्व.डॉ.कलाम यांचे विषयी अभ्यासपूर्ण विचार मांडले.डाॅ.सत्यजित देसाई यांनी वाचन संस्कृती बाबत बालवाचकांशी संवाद साधला,सौ.ऐश्वर्याताई यांनी वाचन संस्कारा बाबत सुंदर विचार मांडले कवी-राजाभाऊ आळवी यांनी कलाम यांच्यावर कविता सादर केली. बालवाचकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर भाषण तसेच पोवाडा सादर केला.शेतकरी जीवनावर भाषणे केली. यावेळी बालकांना अतिथीच्या हस्ते ग्रंथ भेट व खाऊ देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा.राजगोळकर होते.
सेवानिवृत्त मंचचे कार्याध्यक्ष प्रा.मटकर,डाॅ. सत्यजित देसाई,कवी राजाभाऊ आळवी, धों.आ.पाटील गुरुजी पत्रकार प्रा.प्रल्हाद माने,व रविंद्र हिडदुगी, रणजित कांबळे,सौ.सिंधु ढगे,सौ.उज्वला कांबळे, बाळासाहेब नावलगी, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील संचालक टी.बी.कांबळे,सौ.वनिता देसाई उपस्थित होते. आभार प्रिया डिसोझा यांनी मानले.

कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल सौ.शितल शिंदे व लिपिक सौ.माधुरी कुंभार यांनी केले.सप्ताहात

●उद्या दि.१६ ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहिल.●दि.१७/१८ स पहिली-दुसरी व तिसरी-चौथी अशा दोन गटात हस्ताक्षर व रंग- भरण स्पर्धा● दि.१९ खुले ग्रामीण ग्रामीण कवी संमेलन.● दि.२०-महिला मेळावा.हळदी-कुंकू समारंभ व ग्रंथ आपल्या दारी योजनेचा शुभारंभ मार्गदर्शक- सौ.प्रणिता शिपूरकर ●शनिवार दि.२१/१० रोजी बक्षिस- वितरण, गुणवंतांचा सत्कार,आणि सेवानिवृत्त सैनिक श्री. भोसले व श्री. रियाज बागवान यांचा सत्कार, तसेच स्व.डाॅ.एस्. डी.पाटील वाचन-कट्ट्याचे उद्घाटन
आणि वाचन-कट्टा संस्था कोल्हापूर चे संस्थापक अध्यक्ष मा. डाॅ.युवराज कदम यांचे व्याख्यान. येणेप्रमाणे कार्यक्रमांचे नियोजन केले असून सर्वांनी हजर राहावे असे कळविले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks