ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : वरगाव ची अलका चौगुले बनली मुंबई पोलीस

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
वरगाव ता.चंदगड येथील अलका कृष्णा चौगुले हिची मुंबई पोलीस पदी निवड झालेने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.तिने ग्राउंड व लेखी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेने तिची मुंबई पोलीस पदी निवड झाली.तिचे शिक्षण बी.एस्सी. पर्यंत झाले आहे.तिला यासाठी आई सौ.सुनंदा,सौ.नंदा भाऊ भुजंग,वहिनी स्वाती ,भाचा आरव यांचे योगदान लाभले.