भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन ; कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीरपणे पाठीशी असल्याचे दिले वचन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नूतन पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आज सोमवार दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांची कागल येथील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन,नामदार मुश्रीफ यांनी पदाधि काऱ्यांना सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील ,भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, पंचायत समिती भुदरगडचे माजी सभापती विलास बेलेकर ( करवाडी ), भुदरगड तालुका संजय गांधी योजनेचे मा.सदस्य नामदेव चौगले ( मडिलगे खु ), सुनील तेली ( शेणगांव ), भगवान शिंदे (सालपेवाडी ), भाजपा गारगोटी मा. शहराध्यक्ष राहुल चौगले, मा. सरपंच रमेश रायजादे ( पडखंबे ) , आनंदराव रेडेकर, अमोल पाटील(खानापूर), बाजीराव देसाई ( कडगांव ), अशोक येलकर ( बेगवडे ), अविनाश कवडे ( बसरेवाडी ), पी. बी. खुटाळे ( मोरेवाडी ), रामचंद्र पाटील,अनिल पाटील ( आदमापूर ), मोहन सूर्यवंशी, लखन लोहार , प्रविण पाटील (आकुर्डे ), संजय भोसले ( मडीलगे बु ॥ ), पांडुरंग वायदंडे ( नाधवडे ), निवास देसाई ( टीक्केवाडी ), सुरेश किल्लेदार ( गंगापूर ), योगेश पाटील, सचिन देसाई (म्हसवे )आदी उपस्थित होते.