ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नंद्याळ येथील ग्रामसेविका विरोधात उपोषण करणार : सरपंच मनिषा कांबळे

नंद्याळ ता.कागल येथील ग्रामसेविका श्रीमती मिनाज अल्लीसो नदाफ यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सरपंच व ग्रा.पं.सदस्यांनी पंचायत समिती कडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.सरपंच सौ.मनिषा कांबळे उपसरपंच प्रदिप करडे व ग्रा.पं.सदस्यानी गटविकास अधिकारी कागल यांच्या कडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात तक्रार करताना, नदाफ यानी गावची सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, नंद्याळ ग्रा.पं साठी उपलब्ध झालेला 14 व 15 व्या वित्त आयोग रक्कम खर्ची टाकली त्याचा हिशेब नाही. गेल्या तीन आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण झालेले नाही.या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनांकडून करण्यात आला आहे. श्रीमती.नदाफ यांच्या वर कारवाई न झाल्यास 25 आँक्टोबर पासून कागल पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

कामात नियमितता नसणे,डेडस्टाँक रजिस्टर नाही,घरफाळा पाणी पट्टी वसुली नाही,बँकेत रक्कम जमा न करणे..कारभारात दुर्लक्ष करणे,असेसमेंटंची पूर्तता नाही.अशा तक्रारीचा पाढा उपसरपंच प्रदिप करडे व सर्व सदस्यांनी गटविकास अधिकारी संसारे यांच्या समोर मांडला.दरम्यान,ग्रामसेविका नदाफ यांची नंद्याळ येथील कारकीर्द कायम वादग्रस्त ठरली आहे.शिंदेवाडी ता.कागल येथील ग्रा पं.कारभारात गचाळपण निदर्शनास आल्याने यापूर्वी त्यांना निलंबन करण्यात आले होते.

आमच्या ग्रामपंचायतीचा पै-पै चा हिशोब घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि अशा ग्रामसेविकेच्या काळात खीळ बसलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करू.
– प्रदिप मधुकर करडे
उपसरपंच ग्रा. पं. नंद्याळ

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks