ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : राजगोळी बुद्रुक येथील निशिगंधा पाटील ची सीमा सुरक्षा दलात निवड

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
राजगोळी बुद्रुक ता.चंदगड येथील अर्जुन पाटील यांची कन्या निशिगंधा अर्जुन पाटील हिची स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत बी.एस.एफ.(सीमा सुरक्षा दल)मध्ये निवड झालेने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.निशिगंधा हिचे शिक्षण बी.एस्सी. पर्यंत झाले असून फेब्रुवारी 2023 ला तिचे फिजिकल व मेडिकल पुणे येथे झाले व परीक्षा कोल्हापूरला झाली होती. यामध्ये तिने घवघवीत यश प्राप्त केले. यासाठी तिला आई अर्चना,वडील अर्जुन , भाऊ आदित्य यांचे मोलाचे योगदान लाभले.