ताज्या बातम्यामहाराष्ट्र
दूधदर कपातीचा निर्णय मागे न घेतल्यास १५ ऑक्टोबरला निपाणी- मुरगूड हा राज्यमार्ग रोखणार : सोनगे ग्रामस्थांचा निर्णय

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये कपातीचा निर्णय घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ केली आहे.या निर्णयाविरुद्ध कागल तालुक्यातील सोनगे येथील दूध निषेध व्यक्त केला. तसेच, दूध दर कपातीचा निर्णय मागे न घेतल्यास १५ ऑक्टोबरला निपाणी – मुरगूड हा आंतरराज्य मार्ग रोखू, असा इशाराही यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.
मुळात वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूधधंदा नुकसानीचा ठरला .दरवाढ करुन मदतीचा हात देण्याऐवजी कपात करुन शेतकऱ्यांना आर्थिक झटकाच दिला असल्याच्या तीव्र प्रतिक्रियाही शेतकऱ्यांमधून उमटल्या. तसेच, गोकुळने हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहनही अनेक शेतकऱ्यांनी केले आहे.