ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड येथील रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबता थांबेना ; 24 तासांत आणखी 14 जणांचा मृत्यू

विष्णुपुरी नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. मागील 24 तासात आणखी 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक झाले आहे.

2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू होते. 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. अपुरा औषध साठा, परिचारिका, डॉक्टरची रिक्त पदे यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.

त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला. 4 ऑक्टोबर ला सहा जणांना जीव गमवावा लावला होता. तर गुरुवारी 5 ऑक्टोबर ला मागील 24 तासात तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे 4 दिवसात मयतांची संख्या 51 वर पोहचली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks