४३ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोककलेत विवेकानंद, लोकनृत्यात कदम कॉलेज प्रथम ; मुरगूड येथे शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात आयोजित केलेल्या ४३ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विवेकानंद कॉलेज कोल्हापूरने तब्बल ९ क्रमांक पटकावत महोत्सवात वर्चस्व मिळवले. देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर यांनी ६, तर न्यू कॉलेज कोल्हापूरने ६ क्रमांक पटकावले आहेत.
महोत्सवातून विजयी झालेल्या संघाची ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत सातारा जिल्ह्यातील दहिवडी कॉलेज येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
युवा महोत्सवातून अनुक्रमे पहिल्या तीन विजयी झालेल्या महाविद्यालयांची नावे अशी :
लोककला : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.
लोकनृत्य : दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी, व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर..
मूकनाट्य : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर.
नकला : दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग.
मराठी वक्तृत्व : न्यू कॉलेज, कोल्हापूर, श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय,इचलकरंजी ,डी वाय पाटील प्रतिष्ठाण कोल्हापूर
हिंदी वक्तृत्व : न्यू कॉलेज, कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, दूधसाखर महाविद्यालय,बिद्री
इंग्रजी वक्तृत्व : शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर, केआयटी कॉलेज, कोल्हापूर, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर.
वादविवाद : दूधसाखर महाविद्यालय, बिद्री, न्यू कॉलेज, कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर.
सुगम गायन : सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर, न्यू कॉलेज, कोल्हापूर.
लोकसंगीत वाद्यवृंद : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, न्यू कॉलेज, कोल्हापूर, व्यंकटेश महाविद्यालय,इचलकरंजी
लघुनाटिका : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, न्यू कॉलेज, कोल्हापूर, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.