ताज्या बातम्यामहाराष्ट्र
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वच्छता दिन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महात्मा गांधी आणि लाल बहा्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुरगूड येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ्ता मोहीम हाती घेतली. मुलामुलींनी शाळेचा सर्व परिसर,क्रीडांगण ,वर्ग खोल्यांची स्वच्छता केली. सर्व शिक्षकांचा सुध्दा यात सहभाग होता. त्यानंतर सर्वांनी या थोर राष्ट्र भक्तांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन केले व राष्ट्रभक्तीपर घोषणा दिल्या.