मुरगूड येथे उद्या मंडलिक महाविद्यालयात ४३वा जिल्हा युवा महोत्सव

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिवाजी विद्यापीठ व मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी ४३ वा जिल्हा युवा महोत्सव आयोजित केल्याची माहिती प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या युवा महोत्सवात जिल्ह्यातील ८६ महाविद्यालयांतील १५०० युवा कलाकारांचा सहभाग राहणार असून, त्यामध्ये लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, लघुनाटिका, मूकनाट्य, भारतीय समूहगीत, सुगम गायन, मराठी, हिंदी व इंग्रजी वक्तृत्व कला, वादविवाद, प्रश्नमंजुषा, एकांकिका व पथनाट्य, अशा १५
प्रकारच्या कलांचा समावेश आहे..
पाच वेगवेगळ्या रंगमंचावर सादरीकरण होईल. ४५ परीक्षक असतील व दुसऱ्या दिवशी ऑनलाईन निकाल जाहीर होईल.उद्घाटन रविवार, दि. १ रोजी सकाळी ९ वा. अॅड. विरेंद्र मंडलिक, डॉ. पी. टी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सायंकाळी ५ वा. दुसऱ्या सत्रातील लोककला व लोकनृत्य कला सादणीकरणाचे उद्घाटन खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते खा. संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली, आ. प्रकाश आबिटकर, युवा सेना सचिव किरण साळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.