गणेशोत्सवानिमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास बेडकिहाळमध्ये उत्कृष्ट प्रतिसाद

बेडकिहाळ येथील डांब कंदील गणेश मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा एक वेगळा उपक्रम राबविला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, सदस्या कविता जनवाडे, कल्पना पाटील, शारदा पाटील, प्रीती संकपाळ व सुजाता पोतदार उपस्थित होत्या.
इतिहासाचे अभ्यासक व व्याख्याते डॉ. प्रा. गोपाळ महामुनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष शंकर पाटील, सुनील नारे, तात्यासाहेब माने, चंद्रकांत ढोणे, धनंजय मोरे, सचिन पाटील, संजय पाटील, अब्दुलवाहाब पटेल, सुहास डोमणे उपस्थित होते. कार्तिका माने हिने स्वागत केले. शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा समाजाचे ज्येष्ठ नागरिक गणपती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवकालिन शस्त्रे, ढाल, विविध प्रकारच्या तलवारी, वाघ नखे, चिलखती भाले, कुऱ्हाडी, बाण, दगडी बॉम्ब, गुप्त्या, नाणी यांच्यासह मांडण्यात आलेल्या वस्तूंची माहिती शस्त्र संग्राहक अमरसिंह पाटील (सोनगे ता.कागल ) यांनी करून दिली.
प्रदर्शनासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष एकनाथ माने, उपाध्यक्ष विजय भाट, अक्षय माने, प्रल्हाद डांबरे, शामराव माने, अभिजित माने, दीपक सपकाळ, रामा माने, शाम माने, रोहित सपकाळ, बयाजी माने, अनिल कोळी, राजू माने, रामा माने, अजय माने यांचे सहकार्य लाभले.