शिवराज मध्ये झालेल्या कागल तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत जिल्हा स्पर्धेसाठी २७ खेळाडूची निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कागल तालुकास्तरीय शालेय योगा स्पर्धेमध्ये जिल्हा स्पर्धेसाठी २७ खेळाडू पात्र ठरले. स्पर्धेवर हॉलिडेन स्कूल कागलच्या खेळाडूंनी वर्चस्व दाखवले. येथील विजयमाला मंडलिक सांस्कृतिक सभागृहामध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या.
शिवराजचे प्राचार्य पी. डी. माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य रवींद्र शिंदे यांनी केले. तर आभार तालुका क्रीडा समन्वयक एकनाथ आरडे यांनी मानले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अनिल श्रीखंडे व युवराज माने यांनी काम पाहिले. अमर साळुंखे, वाय. बी. माने, अभिजीत पाटील उपस्थित होते.
जिल्हा स्पर्धेसाठी पात्र खेळाडू असे- (कंसामध्ये शाळेचे नाव)
१४वर्षे खालील मुले -कुशल चौगुले, सोहम चौगुले( म्हाळसाकांत अर्जुनी), शुभम चौधरी, श्लोक नागराळे( हॉलिडेन कागल), आयुष माळी (स्वा. विवेकानंद सांगाव), प्रथमेश मगदूम (हॉलिडेन कागल), संस्कार हजारे (स्वा. विवेकानंद सांगाव)
१४ वर्षाखालील मुली-अनुष्का पोळ, जिजाऊ मुळीक, शर्वरी सनगर, सई हिरुगडे, अदिती माने, स्मिरा कासोटे खुशी तांबोळी (सर्वजणी हॉलिडेन कागल)
१७ वर्षाखालील मुले-प्रणव कांबळे, (म्हाळसाकांत अर्जुनी), राजवर्धन पाटील (लिंगनूर विद्यालय)
१७ वर्षाखालील मुली- स्नेहल पाटील, वैष्णवी डोईफोडे, श्रेया कागवाडे, उत्कर्षा चौगुले, वैष्णवी पाटील, पूर्वा देवर्षी, गायत्री मगदूम, अदिती पासवान
१९वर्षाखालील मुली– वंदना चौगुले (देवचंद अर्जुननगर) धनश्री कवडे ( हॉलिडेन कागल)
१९ वर्षाखालील मुले- विश्वजीत पाटील (देवचंद कागल),