ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजरा : हंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आनंदराव मटकर यांच्या सत्काराचे आयोजन

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

हंदेवाडी ता.आजरा येथील सुपुत्र व अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग भायखळा मुंबई चे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदावरून आनंदराव संतू मटकर हे सेवानिवृत्त झालेने ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आनंदराव मटकर यांचा अल्प परिचय थोडक्यात.आनंदराव मटकर यांचे शिक्षण बारावी वाणिज्य पर्यंत झाले असून सातवी पर्यंत महात्मा फुले हायस्कुल बटकनंगले येथे झालेनंतर त्यांनी मुंबई येथे हॉटेल मध्ये नोकरी केली. यानंतर डॉ.वडांबे यांच्या हॉस्पिटल मध्ये पाच वर्षे कंपाउंडर म्हणून कार्यरत असतेवेळी त्यांनी खाजगी क्लास लावून 1983 ला दहावीची परीक्षा दिली व ते उत्तीर्ण झाले.

यानंतर त्यांनी 1984 ला लोकसेवा आयोगाची लिपिक पदाची परीक्षा दिली व ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले व 1985 साली पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालयात त्यांची लिपिक पदी नियुक्ती झाली सदर पदावर कार्यरत असताना त्यांनी आर एम भट नाईट कॉलेज ला प्रवेश घेऊन 12 वी वाणिज्य परीक्षा ते उत्तीर्ण झाले सेवाकाळात त्यांनी लिपिक,लिपिक प्रमुख,प्रशासकीय अधिकारी,वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वर्ग 1 आशा विविध पदावर त्यांना बढती मिळाली 30 जून 2023 ला 38 वर्षांची उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झाले भायखळा मुंबई येथील अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग येथून सेवानिवृत्त झाले.

सेवाकाळात त्यांनी पोलिसांचे पगार वेळेत काढणे,आस्थापना व प्रशासनाचे कामकाज चांगल्या पद्धतीने हाताळले बद्दल वरिष्ठांकडून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे तर पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग यांचेकडूनही त्यांना गौरविण्यात आले आहे सेवनिवृतिनिमित त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने माजी प्रा.एस. डी कदम व सौ.प्रेमा कदम यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम असणार आहेत तर आजरा पोलीस ठाणेचे स.पो.नि. सुनील हारुगडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाचे नियोजन सेवानिवृत्त ए. एस.आय. मधुकर हेबाळकर,मॅनेजर जनार्दन बामणे, पो.पा. पुंडलिक फडके,एन.डी.रेडेकर,माजी प्राचार्य एम.डी कदम,उद्योजक मोहन हेबाळकर व रमेश कदम व प्रकाश जाधव , सेवानिवृत्त ए. एस.आय.-सुरेश शिंदे, के. के. कदम , उपसरपंच सदाशिव हेबाळकर,कृष्णा शिंदे,विष्णू रेडेकर व ग्रामस्थ यांनी केले आहे त्यांच्या जीवनप्रवासात आई कै.श्रीमती राजूबाई, वडील कै. संतू मटकर यांचा त्यांना आशीर्वाद लाभला असून पत्नी सौ.वंदना, मुले अभिषेक,ओंकार यांचेसह सर्व मित्र परिवार,नातेवाईक,ब्रम्हा विकास मंडळ मुंबई यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks