आदर्श शिक्षिका सरिता नाईक शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
चंदगड तालुक्यातील शिरोली शाळेच्या अध्यापिका सौ. सरिता बाळाराम नाईक यांना जिल्हा परिषदेचा सन 2023 चा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी खासदार धैर्यशील माने, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माने, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर , गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सरिता नाईक यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना वडील माजी शिक्षण विस्तार अधिकारी द.ना. नाईक व पती बाळाराम नाईक यांचे प्रोत्साहन लाभले.