कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्ती पत्रांचे वितरण झाले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी गटविकास अधिकारी सुशील संसारे, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प -कागल अंतर्गत नवीन नियुक्ती झालेल्या नूतन अंगणवाडी मदतनीसा॓ची नावे अशी ; सुप्रिया महादेव पाटील- बेलवळे बुद्रुक, वर्षा सचिन पाटील- कौलगे, आरती निवृत्ती भिसुरे -सिद्धनेर्ली, स्वाती संजय कांबळे- आनूर, सविता सचिन तोडकर- लिंगनूर दुमाला, कोमल अभिजीत कांबळे- एकोंडी, कविता सुनील गुरव- व्हनाळी, दिपाली गुरुनाथ कांबळे -शेंडूर, पुनम राजू निऊ॓गरे- साके, गीतांजली नितीन भाले- नानीबाई चिखली, सोनाली संतोष कुदळे- खडकेवाडा, स्नेहल गुरव- सावर्डे बुद्रुक, पूजा समाधान शिंदे- बेलवळे बुद्रुक, रूपाली किसन हेगडे- मौजे सांगाव.