ताज्या बातम्यामहाराष्ट्र
जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा उद्यापासून दीड महिना दर्शनासाठी बंद राहणार

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी दीड महिने बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 28 ऑगस्टपासून 5 ऑक्टोबरपर्यंत मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी बंदच राहणार आहे. खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा हा दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच भाविकांना कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.