ताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजाने व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे, उत्तरेही शोधली पाहिजे : डॉ. राजेंद्र कुंभार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यतिथीनिमित्त विवेक वाहिनी च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दाभोळकराची विवेकवादी वैविकवादी वैचारिक दृष्टीकोन या विषयावर बोलताना यावेळी ते म्हणाले की, देव व धर्माचा वापर सामान्य लोकांना फसविण्यासाठी तसेच पैसा मिळविण्यासाठी केला जातो. समाजाने व्यवस्थेलासुध्दा प्रश्न विचारले पाहिजेत .उत्तरे सुद्धा शोधली पाहिजेत.

. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले की, अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन मोठेमोठया विचारवंताचे एक व्याख्यान आयुष्य बदलून टाकते.

यावेळी डॉक्टर दाभोळकरांच्या प्रतिमेला डॉक्टर राजेंद्र कुमार यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी इतिहास विभागाकडून प्रा. डॉ. पी.आर. फराकटे यानी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी विचार मंचावर प्रा. डॉ. शिवाजी होडगे, प्रा. डॉ. शिवाजी पोवार तसेच उपस्थितीमध्ये प्रा. डॉ. उदयकुमार शिंदे, प्रा. डॉ. एस. के पवार, प्रा. सरदेसाई, प्रा. पां. सारंग, प्रा. विनोद प्रधान, प्रा. सौ. सौनाली कुंभार तसेच बी.ए., बी. कॉम., बी.एससी., बी.सी.ए या विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. ए.के कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पी. पी. कुचेकर यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks