ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आय.ओ.एन परिक्षा केंद्रावर मनमानी कारभार ;आधारकार्ड अपडेट नसल्याच्या कारणामुळे विद्यार्थांना प्रवेश नाकारला ;शिये येथील केंद्र बंद करा अन्यथा केंद्राला टाळे ठोण्याचा संभाजी ब्रिगेड इशारा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आज शीये येथील आय.ओ.एन परीक्षा केंद्रावर आय बी पी एस क्लारक ची परीक्षा होती विद्यार्थ्यांनी सर्व योग्य कागदपत्रे सोबत आणून देखील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला.परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना आधार कार्ड पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी ओळखीचा पुरावा यासाठी एखादा कागदपत्रे लागतात. परंतु सर्व कागदपत्र असताना देखील येथील केंद्र चालकांनी जवळपास 50 विद्यार्थ्यांना आधार कार्ड अपडेट नसल्याच्या कारणास्तव परीक्षेला बसू दिले नाही .केंद्र चालकांचा हा मनमानी कारभार कित्येक दिवस विद्यार्थ्यांनी सहन करावा ?

विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तीन- चार वर्ष अभ्यास करत असतात कराड पंढरपूर सोलापूर पुणे गोवा कोल्हापूर इथून विद्यार्थी येतात सर्व कागदपत्र असताना हुकूमशाही पद्धतीने त्यांच्यावर अन्याय परीक्षा केंद्र करत आहे.मागील काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांच्याकडे मोबाईल आढळला विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला परंतु यांना सहकार्य करणाऱ्या केंद्र चालकांवर गुन्हा दाखल अद्याप झालेला नाही.

गोव्यामधून आलेल्या एका विद्यार्थ्या च्या आधार कार्डवर फोटो हुबेहूब दिसत नसल्याच्या कारणावरून त्याला प्रवेश नाकारला. त्या विद्यार्थ्याने येताना केस कट करून आला होता.कोल्हापूर मधील एक विद्यार्थी 5 ऑगस्ट रोजी आयबीपीएस आर.आर. बी.पीओ या परीक्षेसाठी बसला होता. आज देखील त्याने या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. त्या दिवशी त्याला सर्व कागदपत्रांसहित प्रवेश दिला आज देखील तीच कागदपत्र असताना त्याला परीक्षा केंद्र चालकांनी प्रवेश नाकारला.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी केंद्र चालकांना या संदर्भात जाब विचारला असता त्यांनी तिथून पळ काढला.

आज नाकारलेल्या कित्येक विद्यार्थी निराशेच्या छायेखाली गेले आहेत. या निराशेच्या कारणामुळे आत्महत्या विद्यार्थ्यांनी केली याला प्रशासन जबाबदार असेल का ? असा देखील एक प्रश्न निर्माण होत आहे.विद्यार्थी 12 ते 14 तास अभ्यास करून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात परंतु या परीक्षा केंद्राच्या मनमानी व हुकूमशाहीच्या कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे रोज नुकसान होत आहे.

प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नाही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.
यावेळी पोलीस प्रशासन व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, श्रीनाथ पाटील, नेहा पाटील,स्वाती पाटील, मिलिंद गिरवडे उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks