ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“ मेरी मिठ्ठी ,मेरा देश “ अंतर्गत मुरगूड नगरपरिषद मार्फत सायकल रॅली

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोप “मेरी मिठ्ठी ,मेरा देश” अर्थात “माझी माती ,माझा देश “ अभियान अंतर्गत ०९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत मुरगुड नागरपरिषदे मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करणेत आले आहे. या अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी मुरगूड नगर परिषदेमार्फत दि. १०/०८/२०२३ रोजी शहरात सायकल रॅली व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

सायकल रॅली मध्ये मुरगूड सायकल रायडर्स ,शालेय विद्यार्थी, कर्मचारी व नागरिक यांनी सहभाग घेतला. तसेच शालेय विद्यार्थी व नगरपरिषद कर्मचारी यांच्या सहभागाने शहरात प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीमध्ये मुरगूड विद्यालय,शिवराज विद्यालय व विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संदिप घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.

या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्‍यक्ष दगडू शेणवी, राजु चव्‍हाण, अनिल पाटील, चंदणशिवे, प्रविण सुर्यवंशी, मुसळे सर, अभियंता प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, स्‍नेहल पाटील, प्राजक्‍ता पिंपळे, रणजित निंबाळकर, रमेश मुन्‍ने, अनिकेत सुर्यंवशी सुनील पाटील यांच्‍यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व नागरीक उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks