युवराज येडूरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी अशी स्वयंसेवी, एनजीओ, समाजसेवकासह विविध स्तरांतून मागणी

(स्वयंसेवी, एनजीओ, सामाजिक, सीएसआर यांसह विविध क्षेत्रात युवराज येडूरे यांनी मोलाचे योगदान दिले असून, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची निवड झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल, अशी अपेक्षा सामाजिक, समाजसेवकासह विविध )
प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्वयंसेवी, एनजीओ, सीएसआर, समाजसेवकासह विविध क्षेत्रात युवराज येडूरे यांनी मोलाचे योगदान दिले असून, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची निवड झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल, अशी अपेक्षा स्वयंसेवी संस्था चालकांच्यासह विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी करणाऱ्या युवराज येडूरे यांची या पदासाठी निवड करावी, अशी मागणी महाराष्ट्र एनजीओ समिती विभागाचे प्रदेश सरचिटणीस डॉ लक्ष्मी भारती यांनी केली आहे.
मागील दहा ते बारा दशके समाजकारणात कार्यरत असलेले येडूरे हे २०१६ पासून महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. २००९ पासून सामाजिक क्षेत्राचा कार्यभार सांभाळणाऱ्या येडूरे यांनी सामाजिक क्षेत्रात मोलाचे काम केले आहे.
महिला सबलीकरण, ग्रामीण डेव्हलपमेंट, पर्यावरण संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा जागर घडविण्याबरोबरच या सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे व झोकून काम करणाऱ्यांना सतत बळ व प्रोत्साहन दिले आहे. सामाजिक संवर्धन ही चळवळ व्हावी, या दृष्टीने ते या क्षेत्रात अविरत कार्यरत राहिले आहेत. याशिवाय शिक्षण, सांस्कृतिक, कला – क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, वनौषधी, बँकिंग यांसह वेगवेगळ्या स्तरावरही त्यांनी आपले योगदान दिले आहे. मूळचे भुदरगड तालुक्यातील कोल्हापुर जिल्ह्यातील शेणगाव येथील असलेल्या येडूरे यांचा राज्यभर वावर असतो.
२७२ राधानगरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढविली होती. तसेच महाराष्ट्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन & आयुर्वेद रिसर्च सेंटरचे अध्यक्ष अशा संस्थात्मक अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विविध स्तरांतून त्यांची या पदावर निवड व्हावी, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र एनजीओ समितीचे प्रदेश सरचिटणीस डॉ लक्ष्मी भारती यांनी राज्यपाल यांच्याकडे विधान परिषद सदस्य या पदाकरिता विचार झाल्यास समाजसेवक व जनहितासाठी नागरिकांना सामाजिक क्षेत्राकडे येण्याच्या दृष्टीने चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र एनजीओ समितीचे संपर्कप्रमुख संदीप बोटे, सचिन यादव, अमोल गोरे, प्रताप गोरे, मानसिंग सावरे, राणी पाटील, उषा देसाई, संदीप सरदेसाई, कृष्णात फराकटे, यांनीही अनेकांकरिता ते प्रेरणास्रोत असल्याचे नमूद केले आहे. विविध सामाजिक संस्थांनीही येडूरे यांची निवड झाल्यास मागच्या अनेक वर्षांपासून निरलसपणे काम करणाऱया कार्यकर्त्याचा उचित सन्मान होईल, लवकरच महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून एनजीओ चे शिष्टमंडळ राज्यपाल यांच्याकडे रिसर मागणी केली जाणार आहे असे म्हटले आहे.