ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन पश्चिम विभागच्या संघटन सचिव पदी श्री. शशिकांत खोत यांची निवड

कापशी प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्ह्यात एक नावाजलेले केमिस्ट म्हणून शशिकांत दादा यांचे नाव आहे त्यांनी १९८८ पासून केमिस्ट म्हणून आपला व्यवसाय सुरु केला. सुरवातीला कापशी (सेनापती) येथे रिटेल म्हणून व १९९९ पासून गडहिंग्लज येथे होलसेल औषध व्यवसाय सुरु केला व गडहिंग्लज येथे सर्व जुन्या व नविन औषध व्यावसायकाना एकत्र आणून गडहिंग्लज फार्मा LLP ही फर्म सुरु केली.

हे सर्व व्यवसाय अल्पावधीतच नावारूपाला आणले. उपजतच नेतृत्वगुण अंगी असल्यामुळे यशस्वी व्यवसाया बरोबर केमिस्ह संघटनेचे काम हि चालू केले. महाराष्ट्र राज्याचे केमिस्ट दैवत मा.माजी आमदार जग्गनाथ शिंदे साहेब(आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे काम सुरु केले.

कागल तालुक्यातील केमिस्ट बांधवांची केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटना स्थापन केली. कागल तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे ते संस्थापक आहेत.

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संचालकपदी व सेक्रटरीपदी काम केले. केमिस्ह संघटनेत काम करत असताना त्याची केमिस्ट बांधवांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. यातूनच केमिस्ट संघटनेत एक जाणकार नेतृत्व म्हणून शशिकांत दादा नावारूपास आले.

केमिस्ह बांधवांच्या अडचणी सोडवणे त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणीच्या वेळी हजर राहणे व संघटनेत आप्पाच्या पर्यंत अडचणी पोहचवून त्या अडचणी सोडवणे यामुळेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पश्चिम विभागच्या संघटन सचिव पदी बिनविरोध निवड झाली.

या निवडी कामी मा.माजी आमदार जग्गनाथ शिंदे साहेब(आप्पा), MSCDA चे संघटन सचिव श्री. मदन पाटील, श्री. विजय पाटील.श्री. रविंद्र पाटील, श्री, संजय शेटे, श्री. KDCA चे अध्यक्ष श्री.शिवाजीराव ढेंगे, सचिव श्री. कुमार बोरगावे, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व संचालक यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks