विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसेस ची संख्या वाढवा ; मनसेकडून निवेदन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कागल तालुका अध्यक्ष मा.शिवतेज सुनील विभुते आणि महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार सेना तालुका अध्यक्ष मा.राहुल पाटील यांच्यावतीने निपाणी ते मुरगूड परिसरातून विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात शिकण्यासाठी दररोजची ये-जा करतात. या मार्गावर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या पाहता बसची संख्या अपुऱ्या पडत असुन, ज्या बसेस चालु आहेत त्या इतर ठिकाणांहुन भरगच्च भरून येत असल्याने सुरुपली , यमगे व शिंदेवाडी भागातील विद्यार्थी व प्रवाशांना बसेसमधे जागे अभावी महाविद्यालयात येता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी विद्यालयात जाण्यास उशीर होतो. दररोज सुरूपली ते मुरगूड या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे .
त्यामानाने बसची संख्या कमी आहे. सकाळच्या सत्रात येणारी बस ही सकाळी ६.४५ ते ७.३० या दरम्यान येते यामुळे विद्यार्थी, प्रवासी महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच विध्यार्थ्यांना बस मध्ये जागा मिळत नाही. तसेच बसेस अवेळी असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तरी यावर लवकरात लवकर पाऊले उचलावीत ह्यासाठी निवेदन देण्यात आले .निवेदन देतेवेळी शिक्षक अशोक सुतार मनसे कार्यकर्ते शुभम कुंभार ,सुदेश पेडणेकर ,सहील पाटील , संदीप डोने, रणजित मोरे ,स्वप्नील परीट आदी उपस्थित होते.