नंद्याळ येथे देवचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण ; राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत झाडांची 350 रोपांची वृक्ष लागवड ; ग्रामपंचायत ग्रामस्थ व शाळेचे विशेष सहकार्य

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागावरती असणारे देवचंद महाविद्यालय हे अनेक गावांच्या साठी ज्ञान देण्याच्या बाजूने महत्त्वाची शिक्षण संस्था आहे. याच शिक्षण संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) महत्त्वाचा विभाग देवचंद महाविद्यालय हे नेहमी कृतिशील बाजूने काम करत असते. असेच काम राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नंद्याळ तालुका कागल येथे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांच्या मध्ये निसर्गाबद्दल अधिक प्रेम निर्माण केले.
देवचंद महाविद्यालय अर्जुननगर ता. कागल यांचे वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नंद्याळ ता. कागल हे गावामध्ये मागील वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिर सुरू आहे.चालू वर्षी प्रथमच या गावांमध्ये एकूण 148 विद्यार्थ्यांच्या सहभागाने नंद्याळ गावामध्ये 350 नवीन रोपे लावण्यात आली.
सर्व शिबिरार्थींचे नंद्याळ गावामध्ये आगमन झाल्यानंतर अल्पोपहार नंतर गावातील गल्लीच्या दुथर्फा,स्मशान शेड लगत व डोंगराकडील बाजूस अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडे लावण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.शिलेदार सर यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे फायदे आणि पर्यावरणामध्ये झाडांचे प्रमाण वाढले तर निसर्गाचे चालणारे चक्र नीट राहील असे पर्यावरणाच्या बाजूने महत्त्वाचे मार्गदर्शन करत प्रदिप करडे आणि सर्व सहकाऱ्याचे करत असलेल्या कामाचे कौतुक केले त्यानंतर नंद्याळ ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच प्रदिप करडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना देवचंद महाविद्यालय आणि कार्यक्रम अधिकारी डॉ प्रा प्रविण शिलेदार सर यांचे कायम सहकार्य असल्याबाबत नमूद करत गावच्या वतीने देवचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरार्थींचे व मार्गदर्शक शिक्षकांच्याप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रा.डॉ. कांबळे मॅडम, महाविद्यालयाचे इतर कर्मचारी स्टाफ,नंद्याळ गावचे उपसरपंच प्रदिप करडे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा येजरे, दत्तात्रय कांबळे,संदिप सुतार त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश कांबळे,संजय शिंदे, अँड एच के देसाई, आप्पासाहेब कोराने, आनंदा फगरे, भाऊसो पाटील,नागेश गौड तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विनायक पाटील, बाबसो कोराने ,कॉन्ट्रॅक्टर देसाई मॅडम आणि कर्मचारी आन्नासो कांबळे, संजय धनगर, निलेश आडेकर, विट्ठल कांबळे,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुंभार सर आणि सर्व शिक्षक,गावातील तरुण मंडळे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.*यावेळी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप शिंदे सर यांनी तर आभार संजय शिंदे यांनी मानले.