कोल्हापूर जिल्ह्यातील कामगाराना हक्क मिळवून देणार : गजानन राणे

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी बांधणी करण्याकरिता कामगारांचा मोठा प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यात मिळत आहे. त्रिवेणी हॉटेल आदमापूर येथे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून गजानन राणे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध कंपनीतील कामगारांशी संवाद साधत कामगार संघटनेला बळ देण्यासाठी गजानन राणे यांचा हा दौरा निश्चित करण्यात आला होता.
गजानन राणे यांनी मनकासे पुनर्बांधणी कामगार एकजूट अभियानाची सुरूवात केली असून दरम्यान, कामगारांच्या न्याय हक्कासाठी ह्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गजानन राणे यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. मनसे पक्षाच्या कामगार पुनर्बांधणी या जिल्हा संपर्क अभियानाच्या माध्यमातून कामगार मनसे पक्षबांधणी मजबूत करतांना दिसत आहेत.
या पार्श्वभूमी वरती कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी आता कामाला लागले आहेत, आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा हा कोल्हापूर दौरा पदाधिकाऱ्याने यशस्वी केला, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये बेधडक प्रवेश करत कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या निमित्ताने करण्यात आला.
या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, कामगार सेनेचे चिटणीस रोहन निर्मळ, राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे संघटक युवराज येडूरे, कोल्हापूर वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, विजय करजगार, मनसे माथाडी जिल्हाध्यक्ष अभिजीत तापेकर, मनसे वाहतूक संघटक राहुल कुंभार, भुदरगड तालुका अध्यक्ष अशोक पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, संघटक प्रवीण मनुगडे, शहराध्यक्ष राजेश पाटील, कामगार सेना उपाध्यक्ष अण्णासाहेब बोरवडे, कागल तालुका विद्यार्थी सेनेचे शिवतेज विभुते, रंणजीत पाटील, अमृत पाटील, अमित कोरे, ऋषभ आमते, सौरभ कांबळे, राहुल पाटील, सुशांत मोरे, रोहित भुरटे, कमलेश रंगापुरे, वैभव माने, जयंत कांबळे, सुजित पाटील, सागर पाटील, उत्तम चव्हाण, जगदीश पाटील, निखिल परीट, प्रशांत सनदी, सुदेश पेडणेकर, सौरभ कुंभार ,मारुती केसरकर उपस्थित होते.