ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी ! दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात भीषण आग

दिल्लीच्या AIIMS रुग्णलातील एन्डोस्कोपी कक्षात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. सकाळी 11.54 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर तात्काळ सर्व रुग्णांना इमर्जन्सी वॉर्डमधून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील एंडोस्कोपी कक्षाला आग लागली. सुदैवाने सर्व रुग्णांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे मोठी जीवतहानी टळली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीने काही क्षणातच भीषण रुप घेतलं. आगीचे लोट दूरवरुन दिसून येत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks