ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्व चॅम्पियनशिपसाठी भारताचे 4 भालाफेकपटू पात्र

आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स संघटनेच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताचे चार भालाफेकधारक अॅथलिट्स पात्र ठरले आहेत. दरम्यान पात्र ठरलेला एक भालाफेकधारक दुखापतीमुळे या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही असे अखिल भारतीय अॅथलेटिक्स संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.

हंगेरीतील बुडापेस्ट येथे 19 ते 27 ऑगस्ट दरम्यान विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकधारक नीरज चोप्राने यापूर्वीच आपली पात्रता सिद्ध केली असून त्याने डायमंड अॅथलेटिक्स स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळवल्याने त्याला या आगामी स्पर्धेसाठी वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. भारतातर्फे किशोर जेना, रोहित यादव आणि डी. पी. मनू यांनी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.

दरम्यान रोहित यादवच्या दुखावलेल्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात अल्याने तो या आगामी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार शकणार नाही. विश्वचषक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीची पात्रतेची मुदत 30 जुलैला समाप्त झाली आहे. किशोर जेनाने श्रीलंकन राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावताना 84.38 मी. चे अंतर नोंदवले होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks