ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कळंबा : लोकशाहीर आप्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

कळंबा तर्फ ठाणे येथे लोकशाहीर आप्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.कळंबा ग्रामपंचायतीच्या सदस्या श्रीमती भाग्यश्री पाटोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.तसेच या निमित्ताने येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्या छाया भवड, मंडळाचे अध्यक्ष रणवीर अवघडे आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.सुत्रसंचालन सचिन वायदंडे (येवती) यांनी केले.