ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरीला माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे यांचे स्वागत

नेसरी वार्ताहर
माजी राज्यसभा खासदार व स्वराज्य संघटनेचे संस्थापक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती चंदगड दौऱ्यावर आले असता नेसरी येथे सरसेनापती प्रतापराव गुजर चौक येथे लोकनियुक्त सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच प्रथमेश दळवी, स्थानिक देवस्थान समिती सदस्य विनायक पाटील, दयानंद गंगली, ग्रामपंचायत सदस्य किरण हिडदूगी, माजी सरपंच प्रकाश दळवी, ग्रामविकास अधिकारी सुरेश गुरव, बाबालाल बाणदार, बाळू मकाणदार, अमर कोरे, अनिकेत नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते.