ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पूरग्रस्त भागातील दुकाने आणि टपरीधारकांसाठी राज्य शासन ७५ टक्के खर्च उचलणार

पूरग्रस्त भागातील दुकाने आणि टपरीधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकसानग्रस्त दुकानांचा ७५ टक्के खर्च राज्य शासनाकडून उचलण्यात येणार आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील दुकाने व टपरीधारकांना प्रथमच अशा प्रकारची मदत मिळत आहे.
राज्य शासनाचा विशेष दराने मदत देण्याचा निर्णय घेतलाय. जून ते ऑक्टोबर २०२३ या पावसाळी हंगामात ही मदत दिली जाणार आहे. यामध्ये नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपयांपर्यंत दुकानदारांना मदत मिळणार आहे. टपरीधारकांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल १० हजार रुपयांची मदत मिळणार आहे.