वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा ऊद्या शुक्रवारी सेनापती कापसी येथे सत्कार ; चिकोत्रा खोऱ्याच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा शुक्रवारी दि. २८ सेनापती कापशी ता. कागल येथे सत्कार होणार आहे. सकाळी दहा वाजता येथील बस स्थानकाजवळच्या श्री. भावेश्वरी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती, संयोजक व पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत यांनी दिली. जिल्हा परिषद सदस्य सौ. शिल्पाताई खोत यांच्या अध्यक्षतेखाली चिकोत्रा खोऱ्यातील कार्यकर्त्यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराजबापू पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंहदादा पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीदसाहेब मुश्रीफ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच; चिकोत्रा खोऱ्यातील ग्रामपंचायतचींचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.