पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवून स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांना कृतीतून अभिवादन करूया : श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ; शासन आपल्या दारी कार्यक्रमात २१५७ लाभार्थ्यांना दिला लाभ

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी दोन वेळच्या आमदारकीसह पन्नास वर्षे सार्वजनिक काम केले त्यांचे अमृतमहोत्सवी जयंती निमित्त शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने पात्र शासकीय लाभार्थ्यापर्यंत शासनाचे लाभ पोचवून त्यांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करूया. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
सांगाव जिल्हा परिषद मतदार संघातील शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे होते.
शेती व्यवसाय विद्यामंदिरच्या प्रांगणात झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा २१५६लाभार्थ्यांनी लाभ घेतला. योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी ही मांडलेली संकल्पना शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून व नागरिकांच्या सहभागातून यशस्वी करूया. 75000 लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने म्हणाले, स्वर्गीय राजे साहेब यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त शासन आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम आहे.शासकीय अधिकाऱ्यांनी तळागाळात जाऊन काम केल्यास शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील. या कार्यक्रमातून चांगल्या कामासाठी नेते एकत्र येतात हा चांगला संदेश जाईल.
प्रांताधिकारी सुशांत बनसोडे म्हणाले,पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. यासाठी शासन काम करीत आहे. दप्तर दिरंगाईतून नागरिकांची कामे न थांबता त्यांचा तातडीने निपटारा करण्यात येईल.यावेळी सरपंच विरश्री जाधव राहुल खोत उपसरपंच प्रवीण माळी शाहूचे संचालक युवराज पाटील यशवंत उर्फ बॉबी माने सचिन मगदूम बाबासाहेब मगदूम आदी उपस्थित होते
स्वागत तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी मानले.
श्री घाटगे यांनी लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद……
राजे समरजितसिंह घाटगे यांनी विभागवार केलेल्या नियोजनाच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली . नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना सूचना करून प्रोत्साहन दिले.