भुदरगड तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी
यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष काँ. धनाजी गुरव यांनी तपासणी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले.

गारगोटी : वेंगरूळ
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून वेंगरूळ, दासेवाडी, वेसर्डे, शेळोली या गावातील बांधकाम कामगारांची राम पवार नांदेड व इतर अधिकारी यांनी तपासणी दि. २० रोजी केली. यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष काँ. धनाजी गुरव यांनी तपासणी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले.
महाराष्ट्रामध्ये बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी केल्याचे अनेक तक्रारी वरील कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत या अनुषंगाने मंडळाच्या वतीने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बांधकाम कामगारांची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे त्यातलाच एक भाग म्हणून भुदरगड तालुक्यामध्ये तपासणीसाठी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. यावेळी या अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाऊन काम करत असलेले कामगार दाखवले, या भागामध्ये प्रचंड पाऊस असल्यामुळे अनेक कामे बंद होती तेही त्यांच्या निदर्शनास आणून दाखवले सदर अधिकारी यांनी कामगारांची लेखी म्हणणे दाखल करून घेतले आहे.
यावेळी भुदरगड तालूका अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव अशोक गुरव, भिकाजी देसाई, संजय गुरव, रघुनाथ मेने, राजेंद्र कोगुनकर शामराव जगताप, राजेंद्र देसाई, रूक्मिणी जाधव, अर्चना सुतार आदी संघटनेच्या पदाधिकारी यांनी त्यांना सहकार्य केले.