ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली पाणी पात्राबाहेर, 68 बंधारे पाण्याखाली

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं थोडी उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढली.आज संध्याकाळी 5 वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 68 बंधारे अजूनही पाण्याखाली गेले आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे 35 फुट 5 इंचावर होती. सध्या राधानगरी धरणातून 37 हजार 327 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फुट आहे.