ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर महापालिकेतील विविध प्रश्नांसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोल्हापूर महापालिकेतील विविध प्रश्नांवर आज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विराज चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसुळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विराज चिखलीकर यांनी चालू वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे कोल्हापूर शहरात मध्ये एक दिवस आड पाणी येत आहे . या गोष्टीला पर्याय म्हणून सर्वसामान्य लोकांना घराजवळील किंवा परिसरातील असलेले हँड पंप अर्थात बोरिंग खूप दिलासादायक ठरत आहेत.

पण काही ठिकाणी महानगरपालिकेचे बोरिंग नादुरुस्त असल्यामुळे तेथे पाणी येत नसल्याचे सुचवले. तरी आपण वैयक्तिक लक्ष घालून जल अभियंत्यांना सूचना कराव्यात आणि कोल्हापुरात बंद असलेले बोरिंग परत सुरु करून सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे असे सांगितले.

बोरिंग (हॅन्ड पंप)रिपेअरी करणे, व त्यासाठी लागणारे कर्मचारी हे काहीजण निवृत्त झाल्यामुळे तेथे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीआहे तसेच बोरिंग रिपेरी ची कामेप्रलंबित आहे याकडे सुनील पाटील यांनी लक्ष वेधले.

महापालिकेतील ३५१ हंगामी कामगार व २५४ ठोक मानधनावरील कामगार तसेच पवडी, उद्यान,आरोग्य (स्वच्छता), पाणीपुरवठा या सारख्या अनेक विभागात मनुष्यबळांची कमतरता भासत असल्याने नवीन नोकरी भरती बाबत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी 182 विविध पदांची भरती चे प्रस्ताव करण्याचे काम सुरू आहे तरी लवकरच कारवाई पूर्ण करून जाहिरात काढू असे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले.

कोल्हापुरातील नंगीवली चौक ते मिरजकर तिकटी पर्यंतच्या रस्त्यामध्ये ड्रेनेजलाईन व पिण्याच्या पाईपलाईनचे काम नुकतेच झाले यावर ठेकेदारांना केलेले पॅचवर्क पावसाने धुऊन गेल्यामुळे तेथे पुन्हा एकदा पॅचवर्क करण्याची आवश्यकता आहे,अशी विश्वजीत पवार यांनी सूचना केली.

घरातील कचरा उठावासाठी असलेले टिप्पर गाड्या बहुसंख्य बंद अवस्थेत असल्याने कचरा उठाव होत नाही याकडेही अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष द्यावे असे ओंकार गोसावी यांनी सांगितले.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीकडे चालली असल्याने जर हा पाऊस असाच पडत राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मदतीला भारतीय जनता युवा मोर्चा ची टीम तयार असल्याचे युवराज शिंदे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील प्रदेश कार्यकारणी सदस्य विराज चिखलीकर उपाध्यक्ष सुनील पाटील विश्वजीत पवार ओंकार गोसावी युवराज शिंदे अमित संकपाळ अनिकेत अतिग्रे अमेय भालकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks