ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड शहराला रविवारचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पावसाने दिलेली ओढ , तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सरपिराजीराव तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मुरगूड शहरामध्ये आठवड्यातुन रविवार व गुरुवार हे दोन दिवस पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.
आता पावसाची समाधानकारकपणे सुरवात झाली आहे. परिणामी बंद केलेला रविवारचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. तथापि नेहमीप्रमाणे दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.या पाणी पुरठ्याच्या बदलाची सर्व शहरवासियांनी नागरिकांनी नोंद घेऊन ,पाणी जपून वापरावे. असे आवाहन मुरगूड नगरपरिषदेने केले आहे.