ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : किणेत गुरुपौर्णिमेनिमित विविध कार्यक्रम

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
गुरुपौर्णिमा निमित्त तालसाधना विद्यालय किणे च्या आजी माजी विध्यार्थ्यानी कीणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तोडकर सर केसरकर सर जाधव सर तसेच संदेश कुंभार सर सुशांत गोरे सर ,शास्त्री महाराज व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते तालसाधना विद्यालयाचे गुरुवर्य दळवी गुरुजी यांचे पायपुजन करण्यात आले.
नवीन विध्यार्थ्यांचे सादरीकरण झाले व अखिल भारतीय गांधर्व महाविदयालयच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसऱ्या परीक्षेत भाग घेतलेल्या विध्यार्थ्यांना सर्टफिकेट वाटप करण्यात आले नंतर भोजनाचा कार्यक्रम झाला शेवटी पसायदान घेऊन कार्यकर्माची सांगता करण्यात आली.