मुरगूड विद्यालय ज्यू कॉलेजच्या १९८४-८५मधील विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड विद्यालय ज्यू . कॉलेजच्या सन१९८४- ८५मधील दहावीच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच श्रीराम मंगल कार्यालय ( भूते हॉल ) येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत पार पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं मा . श्री .एस.जी. सावंत हे होते .
प्रथम दिपप्रज्वलन, प्रतिमापूजनानंतर शिवाजी महारांजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली . मयत वर्गमित्र , मयत शिक्षक , शिक्षिका यानां दोन मिनिटे स्थब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .
स्वागत व प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष मा . श्री . राजेखान जमादार यानीं शालेय जीवनातील अनेक आठवणींचा उहापोह करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला . त्यानंतर गुरुजनांचे पाद्य पूजनाचा कार्यक्रम पार पडला . सर्व उपस्थित शिक्षकांचे शाल , श्रीफळ , पानसुपारी , फेटा , सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .
३८ वर्षानंतर भेटलेले माजी विद्यार्थि- विद्यार्थिनीच्या स्नेहमेळाव्यात जून्या वर्गमित्र – मैत्रिणींनी आपल्या शाळेतील जून्या स्मृतीनां उजाळा देत गळाभेटीने आनंद व्यक्त केला .
आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या संस्कारित करणाऱ्या शाळा व शिक्षकांबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली . शालेय जीवनातील केलेल्या गमती -जमती, खोडया ,शाळेला मारलेली दांडी , त्याबद्दल मिळालेली शिक्षा , मित्रांची उडवलेली टर , तर शिक्षकांची केलेली फजिती या अशा असंख्य रम्य आठवणीना यावेळी उजाळा मिळाला .
यावेळी मा . श्री . चंद्रकांत माळवदे सर, सौ .पाटील मॅडम , श्री .एसआर पाटील मुख्याध्यापक ( मु .वि. मुरगूड ) , माजी विद्यार्थी श्री . प्रशांत शहा , श्री . अशोक पाटील , श्री . दत्तात्रय क्षिरसागर , श्री . बाबू रणवरे, संजीव तोरसे, मंजुषा गाडगीळ मुरगूड , सुनिता पाटील यमगे यानीं मनोगत व्यक्त केली .
अध्यक्षीय भाषणात मा . श्री .एस्. जी . सावंत म्हणाले शेतीसह विविध क्षेत्रात छोट्या -मोठया पदावर काम करणाऱ्या या माजी विद्यार्थि- विद्यार्थिनीनी ३८ वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर उत्साही सहभाग हे या स्नेह मेळाव्याचे वैशिष्टय म्हणावे लागेल . या स्नेहमेळाव्याने मी भारावून गेलो . इथून पुढेही एकमेकांच्या गाठीभेटीसाठी असा स्नेहमेळावा घेण्यात यावा अशी भावना त्यानी यावेळी व्यक्त केली .
कार्यक्रमात स्नेहभोजन, व रणजीत कदम यांचा करा ओके या बहारदार गितांनी कार्यक्रमाची सांगता झाली .
या स्नेहमेळाव्यास सर्वश्री वी . रा . घाटगे सर , आर .एच. पोळसर , पी .डी. पाटील सर , चंद्रकांत माळवदे सर इंदलकर सर, कोरे सर , एकनाथ देशमुख सर , व इतर शिक्षक , शिक्षिका व माजी विद्यार्थी राजू चव्हाण , प्रशांत शहा , राहुल घाटगे , उदय राजिगरे , संजय किल्लेदार , निता पाटील कांचन पारिशवाड,मंजुषा कुलकर्णी, राजश्री चौगले समाधान दरेकर , महादेव खाटांगळे यांच्यासह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते . शेवटी आभार अशोक पाटील सर यानी मानले .