मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान गप्प का ? राज ठाकरेंचा थेट मोदींना सवाल

ईशान्य राज्यातील मणिपूरमध्ये अद्यापही हिंसाचार थांबलेला नाही. या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापही यावर आपलं मौन का सोडलं नाही, असा प्रश्न विरोधी पक्षांकडून विचारला जात आहे. आता हाच प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका जाहीर पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पात्र शेअर केलं आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, ”घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले २ महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय? हे कळत नाही.”
मोदींचा उल्लेख करत ते म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं.” ते म्हणाले, ”आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे? हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे.
राज ठाकरे म्हणाले, ”मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल असं वाटलं होतं.”
या पत्रात राज ठाकरे पुढे म्हणाले की, ”मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्येकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे ते पाहून, हे सगळे प्रयत्न वाया जातील अशी भीती वाटते.
ते म्हणाले, ”वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल.”
अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळे दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांना विनंती आहे… pic.twitter.com/lRjS4eMAA8
— Raj Thackeray (@RajThackeray)