ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीत दुधगंगा नदी पात्रात मानवी कवट्या आढळल्‍याने खळबळ

सिद्धनेर्ली ता. कागल येथील नदी किनाऱ्या जवळ दुधगंगा नदी पात्रात अज्ञात व्यक्तींच्या डोक्याच्या चार कवटी आढळून आल्‍या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या लोकांना या कवट्या निदर्शनास आल्या. त्यानंतर कागल पोलिसात याबाबत कळविण्यात आले आहे.सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा येथे दुधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी येत असतात. आज नियमाप्रमाणे पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्‍याने मानवी व्यक्तीचा फक्त डोक्‍याचा भाग (कवटी) दिसुन आली. या कवटीवर मांसाचा कोणताही भाग शिल्लक दिसत नव्हता.

त्यांनी ताबडतोब सिद्धनेर्लीचे पोलीस पाटील उध्दव पोतदार यांना माहिती देवुन पोलीस स्टेशनला कळविणेबाबत सांगितले. कागल पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळताच त्यांनी सदर मानवी कवटी ताब्यात घेतली आहे. त्यानंतर त्याच परिसरात आणखी तीन कवट्या आढळुन आल्‍याचे समजताच कागल पोलीस स्टेशनचे आधिकारी घटनास्थळी पुन्हा रवाना झाले व उर्वरित कवट्याही ताब्यात घेण्यात आल्‍या.

या मानवी कवट्यांवर कोणत्याही प्रकारे मांस नसल्याने ह्या किती दिवसांपूर्वीच्या आहेत, हे सांगता येत नाही. या कवट्या येथे आल्या कश्या, एकाच वेळी चार कवट्या एकाच ठिकाणी सापडल्या असल्याने मोठे गूढ निर्माण झाले आहे

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks