ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीपीआर रुग्णालयामधील रुग्णांची फरपट थांबवण्यासाठी ओपीडी दोन सत्रामध्ये चालू करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापूर मधील सीपीआर रुग्णालय हे अत्यंत कोल्हापूरच्या जनतेसाठी लाभदायक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गरजू कामगार शेतकरी ग्रामीण तसेच शहरी कुटुंबातील हजारो लोक लाभ घेत असतात.

 कोल्हापूर जिल्हा हा विस्तृत आहे.चंदगड राधानगरी आजरा गडहिंग्लज शाहूवाडी हे तालुके जिल्हा रुग्णालयापासून 80 ते 100 किलोमीटरच्या आसपासच्या अंतरावर आहेत येणारे रुग्ण एसटी प्रवास असेल किंवा खाजगी प्रवास करून यायचं असेल तर निदान दोन तास जातात. जिल्हा रुग्णालयांमध्ये आल्यानंतर किमान दोन ते तीन तास केस पेपर काढण्यासाठी लागतात त्यामुळे रुग्णांची उपचारासाठी फरपट होते. रुग्णांना किमान आठ ते दहा वेळेला फेऱ्या माराव्या लागतात यामुळे कित्येक तरी रुग्णुपचारापासून वंचित राहतात.

आता चालू असणारी ओपीडी सकाळी नऊ वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत आहे परंतु येथील ऑफिसर दहा ते अकरा वाजेपर्यंत येतात व साडेबारा वाजता तरी तेथून ते गेलेले असतात ऑफिसर फक्त दोन तास काम करतात .लाखो रुपयांचा पगार घेऊन कोल्हापूरच्या जनतेची तसेच प्रशासनाची फसवणूक करतात असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष निलेश सुतार यांनी केला.

वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने ओपीडीचे दुसरे सत्र दोन ते पाच या वेळेत करावे यामुळे कोल्हापूर मधील विविध तालुक्यातील येणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल व होणारी रुग्णांची फरपट देखील थांबेल येत्या पंधरा दिवसात निर्णय झाला नाही तर प्रशासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निलेश सुतार , अभिजीत भोसले महानगर अध्यक्ष, मदन परीट जिल्हा सचिव, सचिन गुरव करवीर तालुका सचिव, सर्जेराव कोंडेकर,अमोल निकम, महेश गुरव करवीर तालुका सचिव ,दर्शन शहा, सुदेश मनोलकर,भगवान कोइंगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks