ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापशी : बकरी ईद दिवशीच 30 हजार रुपये किंमतीच्या बोकडाचा विद्युत डीपीला शाॅक लागून मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कापशी ता कागल येथे माय्याप्पा डोणे यांचा कळप कापशी निंगनूर रस्त्याने जात असताना रस्त्याच्या साईटला विद्युत डी पी होता. रस्त्याने जात असताना कळपातील एक बकरे त्या डीपी खाली चरण्यासाठी गेले. डीपीला करंट उतरल्यामुळे तो करंट बकऱ्याला लागून बकरे मरण पावले.

ही घटना यशवंत क्रांती संघटना कागल तालुका उपाध्यक्ष मा श्री सिध्दू दिवटे व सामाजिक कार्यकर्ते मा श्री संदिप हजारे कागल यांना ही घटना समजताच तातकाळ विद्यूत आधिकार्याशीं बोलून त्यांना तात्काळ मदत मिळवून दिली.

त्या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मा श्री संदिप हजारे कागल यशवंत क्रांती संघटना कागल तालुका उपाध्यक्ष सिध्दू दिवटे सोमा डोळे, मायाप्पा पिसुत्रे, क-याप्पा अनुशे, केचाप्पा डोणे, विठ्ठल अनुशे, बंडा दुधाचे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks