ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : बीआरएसकडून राजू शेट्टी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर ; राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केलं आहे. बीआरएसच्या चालीमागील डाव आहे तरी कोणाचा? अशी राजकीय पटलावर चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. राजू शेट्टी यांनी या ऑफरचा गौप्यस्फोट केला आहे. शेट्टी यांनी सांगितले की, मला देखील मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव संपर्कात आहेत. दरम्यान, राजू शेट्टी यांनी केसीआर यांनी दिलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली असून स्वतंत्र राहून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

“केसीआर यांच्याकडून तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करु असे सांगण्यात आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, केंद्रीय कोअर कमिटीमध्येही आपणास सदस्य करु असे म्हटले होते.” शेट्टी पुढे म्हणाले की, “मला मात्र आता कोणत्याही पक्षात जायचं नाही. त्यामुळे मी त्यांना नकार दिला आहे.” ते म्हणाले की, “के चंद्रशेखर राव हे माझे 2009 पासून चांगले मित्र आहेत.”

राजू शेट्टी यांनी यावेळी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत भाजपने आमची फसवणूक केली आहे. त्यांचे गुजरात मॉडेल फोल ठरलं आहे. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा अशा कोणत्याही पॅटर्नमुळे फसवणूक होणार नाही याची खात्री करुन घेणे गरजेचं आहे.” दरम्यान, राजू शेट्टी यांनी चंद्रशेखर राव यांच्या बाबतीत सूचक वक्तव्यही केले. ते म्हणाले की, “चंद्रशेखर राव हे प्रामाणिकपणे जर त्यांचा अजेंडा चालणार असतील, तर त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती वाटेल.”

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बीआरएस पक्षासाठी बंद करण्यात आली आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तशी घोषणाच केली आहे. विशेष म्हणजे बुधवारी दिवसभर केसीआर पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावुर होते. सरकोलीमध्ये भगिरथ भालके यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम सुरु असतानाच हा निर्णय जाहीर करण्यात आला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks