ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिअरबार शॉपीला एनओसी देण्यासाठी लाचेची मागणी, ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

बिअरबार शॉपी चालू करण्याकरिता ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र व ठराव देण्यासाठी 5 हजार रूपयाची मागणी केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनने गुन्हा दाखल केला आहे.

शरदचंद्र ताम्रध्वज बलसुरे (46, पद – ग्रामसेवक, येनेगुर, ग्रामपंचायत, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे लाचेची मागणी करणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी मौजे येणेगुर येथील शेत गट नंबर 270 मध्ये बिअरबार शॉपी चालू करण्याकरिता ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र व ठराव मिळणे कामी अर्ज व आवश्यक असलेले कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात दिलेले होते.

सदर ना हरकत प्रमाणपत्र व ठराव देणे कामी यातील शरदचंद्र ताम्रध्वज बलसुरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दि. 25 /04/2023 रोजी पंच साक्षीदारासमक्ष 5,000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून दिनांक 27/04/23 रोजी सापळा कारवाई करण्यात आली होती. परंतु लोकसेक हजर नसल्याने सापळा कारवाई स्थगित करण्यात आली. परंतु लोकसेवक यांना संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे आज रोजी तक्रारदार यांनी फिर्याद दिल्याने मुरूम पोलिस स्टेशनमध्ये बलसुरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे ,अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे , पोलिस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास राठोड ,पोलिस अंमलदार इफ्तिकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, चालक पोलिस दत्तात्रेय करडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks