ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला केले ब्लॅकमेल ; बदनामीची धमकी देऊन अश्लिल व्हिडिओ काढून 5 हजार अमेरिकन डॉलरची केली मागणी

प्राध्यापिकेला व्हॉटसअप कॉल करुन विद्यापीठात बदनामी करण्याची भिती घालून त्यांचा अश्लिल व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल करुन त्यांच्याकडे 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मयांक सिंग (वय 26, रा. पाटणा, बिहार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मांजरी येथील एका 36 वर्षाच्या प्राध्यापिकेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. 924/23) दिली आहे. हा प्रकार मार्च 2020 पासून आतापर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करतात. तेथील मयांक सिंग याने त्यांच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर त्याने व्हॉटसअप कॉल करुन त्यांना “तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,” अशी भिती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ कॉल इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर दुसर्‍या आयडी वरुन फिर्यादी यांना अनेक अ‍ॅडिओ व व्हिडिओ कॉल केले. आणखी एका इन्स्टाग्राम आयडीवरुन फिर्यादी व त्यांचे पतीला फिर्यादीचे न्यूड व्हिडिओ पाठवून त्यांच्या 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. पैसे नाही दिले तर फिर्यादीचे न्यूड व्हिडिओ सगळीकडे पाठविण्याची धमकी दिली. हा प्रकार फिर्यादीच्या पतीला समजल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks