ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आता ई-केवायसी साठी चेहरा स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण करता येणार

किसान सन्मान निधीसाठी लाभार्थ्यांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत ई-केवायसी सुविधा फक्त ओटीपी किंवा फिंगरप्रिटद्वारे उपलब्ध होती. आता शेतकऱ्यांचा चेहरा स्कॅन करूनही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना यापुढे ओटीपी प्रक्रियेतून जावे लागणार नाही. यासाठी केंद्र सरकारकडून मोबाईल अॅप्लिकेशनवर ‘फेस ऑथेंटिकेशन’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे.