ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बिद्री कारखाना निवडणूक : सुनावणी पुन्हा २७ पर्यंत लांबणीवर

कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला शासनाने दिलेली स्थगिती उठवावी आणि कारखान्याची निवडणूक त्वरित घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका सत्ताधारी गटाच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात काल पुन्हा शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली.
गुरुवारी विरोधी गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता, तर आज सत्ताधारी गटाच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले, परंतु आजच्या सुनावणीवेळी विरोधी आमदार प्रकाश आबिटकर गटाचे वकील अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने उर्वरित सुनावणी २७ जून रोजी घेण्याचे जाहीर केले.