सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या चेअरमनपदी खासदार संजय मंडलिक यांची निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या चेअरमनपदी खा. संजय मंडलिक, तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजीराव इंगळे (शेंडूर) यांची एकमताने निवड झाली.
कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली.
चेअरमनपदासाठी खा. मंडलिक यांच्या नावास सूचक विश्वास कुराडे, तर प्रकाश पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी इंगळे यांच्या नावास सूचक अॅड. वीरेंद्र मंडलिक, तर कैलास जाधव यांनी अनुमोदन दिले.
यावेळी संचालक प्रा. संभाजी मोरे, तुकाराम ढोले, आनंदा फराकटे, कृष्णा शिंदे, धनाजी बाचणकर, महेश घाटगे, मंगल तुकान, पुंडलिक पाटील, प्रदीप चव्हाण, चित्रगुप्त प्रभावळकर, विष्णू बुबा, नंदिनीदेवी घोरपडे, प्रतिभा पाटील, नेताजी पाटील यांच्यासह आर. डी. पाटील, शहाजी यादव, बाळासाहेब पाटील, नंदकुमार घोरपडे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. आभार संचालक सत्यजित पाटील-सोनाळीकर यांनी मानले.