ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : दड्डी येथे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल सत्कार समारंभ

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
दड्डी-रामेवाडी येथील कन्या शुभांगी उर्फ अश्विनी भैरू नार्वेकर हिची हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर पदी निवड झालेबद्दल तसेच धोंडिबा बाबू करतस्कर हे भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेबद्दल व मारूती तुकाराम नार्वेकर यांची माध्यमिक विद्यालय मोदगे येथे शिक्षक पदी निवड झालेबद्दल श्री चाळेश्वर गणेशोत्सव ,नवरात्र उत्सव कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने या सर्वांची सजविलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली.
श्रीमती सुंदराबाई भांदुर्गे हायस्कुल पासून श्री चाळेश्वर मंदिरपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली .यावेळी प्राथमिक मराठी शाळा दड्डी-रामेवाडी यांचेवतीने लेझीम तसेच ढोल तश्याच्या गजरात मिरवणूक पार पडली.यानंतर श्री चाळेश्वर मंदिर मध्ये सत्कार समारंभ पार पडला. यावेळी गावातील नागरिक ,शालेय विद्यार्थी ,सर्व उपस्थित होते.