शिवप्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

योग ही भारतीयांनी संपूर्ण जगाला दिलेली अनमोल अशी देणगी आहे पण दुर्दैवाने त्याचा विसर पडत चाललेल्या आजच्या पिडीला जीवनातील योगाचे महत्व पटावे व योग विद्येच्या आधारे आरोग्यपूर्ण व दिर्घायूष्याची साथ धरावी यासाठी योग महत्त्वाचे आहेत.
धामोड येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थीदशेतील मुले व सर्वांनी एका मंचावर एकत्र येत विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. एकत्र येत अत्यंत उत्साहात हा दिवस साजरा केला. अध्यापक व योगशिक्षक विश्वास पाटील यांनी योगासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानने लहान मुले, युवक, विद्यार्थ्यांना योगासनाचे तंत्र शिकण्यासाठी व कुठेही सहजपणे करता येईल अशी आसने शिकण्यासाठी आमंत्रित केले होते. शरीर व मनातील समतोल साधत ताणतणाव दूर कसा करावा हे सर्वांना शिकविणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. हसतखेळत योगासने शिकल्याने या विद्यार्थ्यांमध्ये रस निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची तयारी करत असताना मुलांमध्ये सळसळणारा उत्साह जाणवत होता. यावेळी विद्यार्थ्यांनी योगसूत्र सादर केले. प्राणायम, सूर्यनमस्कार, ताडासन, अर्ध चक्रासन, शशांकासन, भुजंगासन, पवनमुक्तासन इत्यादी विविध योगमुद्रांची प्रात्यक्षिकेही त्यांनी दाखवली. विविध आसने, प्राणायम आणि ध्यानधारणेचे विशिष्ट फायदे आणि योगासनाचे हे प्रकार कसे करावेत याची माहिती देण्यावर भर दिला. स्वास्थ्य जपण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी योगसाधना करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले.