कागल तालुक्यातील चौंडाळ येथे लम्पिस्किनने आठ जनावारे दगावली ; पशुपालकांचे लाखोंचे नुकसान

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लम्पिस्किनच्या दुसऱ्या लाटेत जनावरे मोठ्या प्रमाणात दगावत आहेत. चौंडाळ येथील सहा दुधाळ गायी व दोन बैल अशा आठ जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. दहाहून अधिक जनावरे अत्यवस्थ स्थितीत आहेत. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे पशुपालक चिंताक्रांत झाले आहेत.
गेल्या तीन आठवड्यांत चौंडाळ येथील महादेव दादू पाटील, पांडुरंग रामचंद्र पाटील, विकास निवृती पाटील, आप्पासो दिनकर रेपे, विठ्ठल शामराव पाटील यांच्या गायींचा तर, दत्तात्रय कृष्णा पाटील, दयानंद आनंदा पाटील यांचे बैल अशा आठ जनावारांचा मृत्यू. लम्मिस्किन आजाराने झाला आहे. सात महिन्यांपासून लम्पिस्किनचा सामना जनावरे व पशुपालक करीत आहेत.
महागड्या औषधांवर खर्च करूनही जनावरे दगावल्याने पशुपालकांचे दुहेरी आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे पशुपालन आर्थिक अडचणीत सापडला आहे